आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:‘ग्लोबल गणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत  थेट सिंगापूरमध्ये ‘दगडूशेठ’चे बाप्पा विराजमान

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदा राबवण्यात येत असलेल्या ग्लोबल गणेशोत्सवांतर्गत थेट सिंगापूरमध्ये दगडूशेठ गणपतीची हुबेहूब प्रतिकृती असलेले बाप्पा विराजमान झाले आहेत. पुण्यातून आॅगस्ट महिन्यात ही मूर्ती सिंगापूर येथे पाठवण्यात आली होती. तसेच उत्सव मंडपातदेखील थायलंडसह विविध देश व गुजरात, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, हरियाणा आदी राज्यातील गणेशभक्तांची गर्दी होत असून खऱ्या अर्थाने ग्लोबल गणेशोत्सव साजरा होत आहे.

यंदाचे उत्सवाचे १३० वे वर्ष असून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाद्वारे उत्सवात परदेशी व भारताच्या विविध राज्यांतील पर्यटक दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सवाचा वारसा आणि संस्कृती जगभरातील लोकांना जाणून घेता यावी आणि ही संस्कृती जगभर पोहोचावी यासाठी पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या पर्यटन विभागातून परदेशी व विविध राज्यांतील नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे.

गर्दी वाढली } पर्यटन विभागामार्फत परदेशी नागरिकांचा सहभाग

सहभागींना प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन याशिवाय महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणेतर्फे सिंगापूरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सहभागींना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहितदेखील केले जात आहे. साहित्यवाचन, विविध गुणदर्शन, व-हाड निघालंय लंडनला असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव ग्लोबल उत्सव म्हणून साजरा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...