आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडीची समस्या:पुण्यात अद्याप उडती बस नसल्याने चालतच गणपती पाहतो : जयंत पाटील

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वाहतुकीची समस्या हा कायमच चर्चेचा विषय. या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुणेकरांसमोर एक नवीनच कल्पना मांडली. गडकरींची कल्पना अशी आहे की.पुण्यात उडत्या बसची योजना आणली.तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास फायदा होईल. त्यावर गणपतीच दर्शन करण्यासाठी शनिवारी दुपारपासून जात आहे.रस्त्यावर प्रचंड गर्दी आहे.उडत्या बसची वाट बघितली. त्यामुळे वेळ झाला. अजून उडती बस नाही हे लक्षात आलं म्हणून मग चालतच सगळे गणपती फिरत आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना शनिवारी लगावला.

शनिवारी पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपती आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दर्शन घेऊन आरती केली. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी व भाजपला हरवावे असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले,मला वाटत देशातले सर्व पक्ष या निष्कर्षावर आले आहेत. की हा देश हुकूमशाही प्रवृत्तीच्या हाती जात आहे.सगळया व्यवस्था झाकोळल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्व पक्ष एकत्रित यायला सुरूवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...