आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांचा पाहुणचार:पोलिस आयुक्त वारकऱ्यांसाठी बनले वाढपी, सपत्नीक वारकऱ्यांसोबत घेतले जेवण

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी आहे. या सोहळ्यासोबत हजारो वैष्णवांचा मेळा मुक्कामी पुण्यात आहे. तब्बल दोन वर्षानंतर वारकऱ्यांचा पाहुणचार करण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. दरम्यान, आज दिवसभर दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी भक्तीरसात मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत आज पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांनी वाढपी म्हणून जेवण देत त्यांचा पाहुणचार केला. तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सपत्नीक संत ज्ञानेश्वर माहाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पुण्यात शांतता नांदू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यानंतर त्यांनी वारकऱ्यांच्या पंगतीला त्यांनी वाढपी म्हणून सेवा केली. तसेच वारकऱ्यांच्या सोबत त्यांनी भोजनाचाही आस्वाद घेतला.

दरम्यान, माऊलींचा सोहळा हा भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांचा पालखी सोहळा हा विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत सोबत प्रवास करणार असून त्यानंतर दिवे घाटातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर तुकोबांची पालखी ही पुणे सोलापूर मार्गाने पंढरपुरच्या दिशेने प्रवास करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...