आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रीया अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज मतमोजणीच्या दिवशी भावनिक प्रतिक्रीया दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूका हा राज्यभर चर्चेचा विषय आहेत.
काय म्हणाल्या अश्विनी जगताप?
त्या म्हणाल्या, “मला आज साहेबांची खूप आठवण येत आहे. निकालाकडे बघताना तसा फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारे कुणी असावे, त्यांची कामे वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारे कुणीतरी असावे यासाठी खरेतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले.
कामाची पावती
अश्विनी जगताप पुढे म्हणाल्या, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला, सभा घेतल्या. भाजपाचे भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन.असे त्या म्हणाल्या.
बिनविरोध झाली असती तर..
“ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं”, असे सूचक वक्तव्य अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी बाेलताना केले.
मतमोजणीला सुरुवात
आज (गुरूवार) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मोजणीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या. या मोजणीत पहिल्या फेरीत नाना काटे 3604, अश्विनी जगताप यांना 4053 मते आणि राहुल कलाटे 1273 मते मिळाली. पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.