आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला मारहाण:अमली पदार्थ सेवन केल्याची विचारणा केल्याने 'तुझी विकेटच टाकतो' अशी पोलिसालाच धमकी

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ सेवन केल्याबाबत विचारणा केल्याने एकाने पोलिसाला मारहाण केली. तू माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो, तुझी विकेटच टाकतो, अशी धमकीही त्याने पोलिसाला दिली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. हा प्रकार रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तुपे वस्ती, मोशी व वायसीएम हाॅस्पिटल, पिंपरी येथे घडला.

महादेव दत्तात्रय खंडागळे (वय 40, रा. चांडोली, राजगुरूनगर, ता. खेड,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस नाईक बिराप्पा दत्तू बनसोडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कुठले तरी अमली पदार्थ सेवन करून सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एका इसमास धक्काबुक्की करून आरडाओरडा करत होता. त्यावेळी फिर्यादी पोलिस कर्मचारी बनसोडे यांनी आरोपीला विचारणा केली.

त्यामुळे आरोपीने फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम हाॅस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे केस पेपर काढण्यासाठी त्याला घेऊन जात असताना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तू माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो, तुझी विकेटच टाकतो, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर तो फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...