आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती गुन्हेगारी:रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितल्याने टोळक्याकडून दोघांवर वार, आरोपींवर गुन्हा दाखल

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यपान करून रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांना बाजूला होण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने दोघांवर तलवारीने वार करुन गंभीररित्या जखमी केले. ही घटना 12 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास कोंढवा बुद्रुकमधील आश्रफनगरमध्ये घडली. याबाबत मंगळवारी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शान खान (वय 19रा. कोंढवा,पुणे) आणि मेहबुब अनपीन अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साहिल नवाज शेख, सोमनाथ भाउसाहेब सरतापे (वय 22), अरबाज इलियास खान (वय 23), सलीम शब्बीर चौधरी (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

तलवारीने वार

कोंढवा बुद्रुक परिसरातील आश्रफनगरमध्ये मेहबुब अनपीन यांचा फर्निचर कारखाना आहे. 12 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास परिसरात मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी शानने त्यांना रस्त्यावर थांबू नका, असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने शान यांना मारहाण केली. त्यावेळी मेहबूब यांनी मध्यस्थी केली असता, टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने वार करुन दोघांनाही जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक स्वराज्य पाटील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...