आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलात खळबळ:1 लाखाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून गुरुवारी संध्याकाळी देविदास काजळे या सहाय्यक पोलिस निरीक्षकास अटक केली आहे.

याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या तक्ररादर यांचे रांजणगाव पोलिस ठाण्यात एक प्रकरण होते. त्यात मदत करण्यासाठी साह्याक पोलिस निरीक्षक देविदास काजळे यांनी एक लाख रुपयांची लाच तक्रारादर यांच्याकडे मागितली. मात्र, ते लाच देण्यास इच्छुक नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडेरीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने गुरवारी रांजणगाव परिसरात सापळा रचला. त्यावेळी सहयाक पोलिस निरीक्षक काजळे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करून त्याप्रमाणे पैसे स्वीकारता असताना त्यास अचानक छापा टाकून एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात लाचखोर पोलिस अधिकारी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदरची कारवाई पुणे एसिबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलिस अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...