आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीची कोर्टात आज हजेरी:लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकाला एटीएसकडून अटक; सोशल मीडियातून करायचा मुलांचे ब्रेनवॉश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित मोहंमद जुनैद याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. तथापि, या दहशतवाद्यांची पाळेमुळे जम्मू-काश्मिरात असल्याने महाराष्ट्र एटीएस पथक काश्मीरला गेले होते. तिथे पथकाकडून लष्कर-ए-तोयबासाठी भरती करणाऱ्या हस्तकाला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला चौकशीसाठी पुण्यात आणले जाणार असून शुक्रवार, ३ जून रोजी न्यायालयात हजर केले जाईल. पुण्यात गेल्या आठवड्यात २६ वर्षीय मोहंमद जुनैद या तरुणाला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली होती. जम्मू-काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता. हे प्रकरण मोठे असल्याने याचा तपास करण्यासाठी पुणे व महाराष्ट्र एटीएसच्या १२ अधिकाऱ्यांचे पथक जम्मू-काश्मीरला गेले होते. दरम्यान, या पथकाने जुनैदच्या हँडलरला अटक केली असून त्याचा न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवला.

जुनैदचे केले होते ब्रेन वॉश
सोशल मीडियाद्वारे दहशतवाद्यांच्या संपर्कात आलेल्या जुनैदचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. जुनैद हा महाराष्ट्रातील तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करत होता. तो ‘लष्कर’च्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. नंतर तो काश्मीर सोडून पुण्यात आला. येथून तो मुलांचे ब्रेनवॉश करत होता.

बातम्या आणखी आहेत...