आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे एटीएसची कारवाई:लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इनामूल हकला बेड्या; जुनेदच्या माध्यमातून होता संघटनेच्या संपर्कात

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तरुणाला पुणे एटीएसने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. इमानूल हक असे या तरूणाचे नाव असून, त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून यापूर्वी एटीएसने पुण्यातील दापोडी आणि काश्मिरमधून दोघांना अटक केली होती. इनामूल हक असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जुनेद याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यास लष्कर-ए-तोयबाचा भरती करणारा आरोपी उमर (पाकिस्तानात असलेला) याच्याशी संपर्क करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

लष्कर-ए-तोएबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद महंमद (वय 28, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलडाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. संशयित जुनैद, आफताब यांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसला इनामूल हक लष्कर-ए-तोएबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने उत्तर प्रदेशातून इनामूल हक याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...