आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:दोन वेळा सुधारण्याची संधी देऊनही पत्रकार तरुणींचा ओढा दहशतवादाकडे, पुढील तपासासाठी एटीएस पथकाने तरुणीस नेले दिल्लीस

पुणे3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक अल्पवयीन मुलगी इसिसच्या जाळ्यात

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे जगभरात पसरलेली दिसतात. सदर संघटनेच्या प्रचाराला बळी पडून अनेक तरुण-तरुणी दहशतवादी संघटनेत सक्रिय झाले आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारे पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक अल्पवयीन मुलगी इसिसच्या जाळ्यात अडकली. परंतु दहशतवाद विराेधी पथकाच्या (एटीएस) रडारवर ती आली आणि तिला इसिसमध्ये जाण्यापासून राेखण्यात तपास यंत्रणांना यश आले हाेते. त्यानंतरच्या काळात आयुष्य सुधारण्याची संधी असतानाही पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेली सदर तरुणी दहशतवादी संघटनाच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

एनआयएचे पथकाने सादिया अन्वर शेख (२१) आणि नाबिल सादिक खत्री (२७) या दाेघांना रविवारी ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी दिल्लीस पुढील तपासाकरिता घेऊन गेले असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीतील जामिया नगर केस प्रकरणात सदर दाेघांना अटक करण्यात आली आहे. तिहार जेलमध्ये बंदी असलेला इसिसचा सदस्य माेहम्मद अब्दुल बासितशी संगनमत करून त्यांनी भारतात इसिसच्या माध्यमातून माेठया प्रमाणात हिंसक हल्ले करण्याचा कट रचला. एनआयएने सदर तिघांना ताब्यात घेऊन चाैकशी सुरू केली. त्यावेळी इसिसशी त्यांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

सादियाला दहावीत ९० टक्के गुण

सादिया शेखही वयाच्या १६ व्या वर्षी २०१५ मध्ये इसिसच्या संपर्कात आली व तिच्या बाेलण्या- वागण्यात फरक पडू लागला. तिचे वडील लहानपणीच वारले. आई नाेकरी करते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिचे शिक्षण झाले असून दहावीत तिला ९० टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर पुण्यात तिने विज्ञान शाखेत १२ वीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती बारामतीत एका महाविद्यालयात पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षात शिकते.