आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Attack On A Person Out Of Anger For Stoning Dogs | ​​​​​​​​​​​​​​ Pune News ​​​​​​​

पुण्यातील घटना:कुत्र्यांना दगड मारल्याच्या रागातून व्यक्तीवर कुऱ्हाडाने वार; संशयित आरोपीला अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुत्रे अंगावर भुंकत असल्याने त्यास दगड मारल्याने एका तरुणाने 40 वर्षीय व्यक्तीच्या ताेंडावर कुऱ्हाडीने वार करुन त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत रवी त्रिंबक घाेरपडे (वय-40,रा.बाणेर राेड,पुणे) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी आराेपी आयुब बाशा शेख (वय-34,रा.पुणे) यास अटक केली आहे.

काय आहे घटना?

ही घटना तीन डिसेंबर राेजी रात्री बाणेर परिसरात शिंदेमळा येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारदार रवी घाेरपडे व आराेपी आयुब शेख हे एकमेकांचे ओळखीचे असून तक्रारदार घाेरपडे तीन डिसेंबर राेजी रात्री घरी जात असताना त्यांचे अंगावर कुत्रे भुंकत हाेते. त्यामुळे त्यांनी कुत्र्यास हाकलून लावण्यासाठी कुत्र्यांना दगड मारला. त्यावेळी अाराेपी अायुब शेख याने कुत्र्यांना दगड का मारताे असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर थाेडया वेळाने अाराेपी शेख हा घाेरपडे यांचे घरी येवुन कुत्र्यांना दगड मारला याचा राग मनात धरुन हाात कुऱ्हाड व कुदळ घेऊन शिवीगाळ तसेच आरडाओरड करुन दहशतीचे वातावरण निर्माण केले. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घाेरपडे यांचे ताेंडावर कुऱ्हाडीने वार करुन गंभीर रित्या जखमी केले. याप्रकरणी पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस झरेकर करत आहे.

अल्पवयीन मुलीला केले गरोदर

पुण्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस 18 वर्षीय तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवून तिला गराेदर केले. आराेपीने मे 2022 ते जुलै 2022 यादरम्याने त्याचे राहते घरी मुलीस बाेलवून घेत तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडित मुलीच्या 45 वर्षीय आजीने आराेपी विराेधात लाेणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पाेलीसांनी सचिन बबन माळी (वय-18) या आराेपीस अटक केली आहे. याबाबत पुढील तपास लाेणीकंद पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...