आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींविरोधात गुन्हा दाखल:कुत्र्याला मारलेला दगड आपल्याला मारल्याचे वाटून तरुणावर हल्ला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने चालत निघालेल्या एका तरुणाच्या अंगावर पाठीमागून कुत्रा धावत आला. त्यामुळे त्या तरुणाने कुत्र्याला दगड फेकून मारला. दरम्यान, तेथून काही मुले दुचाकीने जात होती. त्यांना आपल्यालाच तरुणाने दगड मारल्याचे वाटले. त्यातून झालेल्या वादात चौघांनी संबंधित तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी, हडपसर पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कैलास विठ्ठल हेगडे (२३,रा. काळेपडळ हडपसर,पुणे) याने फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास रेल्वेगेट काळेपडळ हडपसर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा रस्त्याने चालत निघाला होता. कुत्रा पाठीमागून अंगावर धावून आल्याने त्याने रस्त्यावरील दगड उचलून त्याच्या दिशेने फेकला. हा दगड आरोपींकडे गेला. त्यामुळे त्यांनी फिर्यादी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.

अपघात घडवल्याचे सांगत तरुणास ४० हजार रुपयांना लुटले : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका व्यक्तीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्यांनाच आमचा तुम्ही अपघात केला आहे. ४० हजार रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून संबंधित व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीने २० हजार रुपये ऑनलाईन आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...