आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांवर लक्ष्य ठेवण्यासाठी एचएमव्ही गट कार्यरत:पत्रकारांवर होणारे हल्ले ही बाब चिंताजनक; अजित पवार यांनी व्यक्त केली खंत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ले झालेले असून सध्या आरोप सुरू हे घातक आहे. राज्याच्या दृष्टीने पत्रकारांवर हल्ले होतात ही बाब चिंताजनक आहे. रपसिंगर याने खोक्यावर गाणे गायले त्याने कोणाचे गाण्यात नाव घेतेल नाही मात्र, त्याच्यावर चुकीची कारवाई केली गेली. पत्रकार यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी एचएमव्हीं गट कार्यरत आहे.

दुर्देवी बाब

अजित पवार म्हणाले की, पत्रकार यांना चहा - बिस्कीट पत्रकार म्हणून हेटाळणी केली जाते ही बाब दुर्देवी आहे. पत्रकार यांच्यावर विविध आरोप करून नावे ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला आहे असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार शाम दौंडकर यांनी लिहिलेल्या धडपड या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचा अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, बाबुराव चांदेरे,प्रशांत देशमुख उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की,, विविध क्षेत्रातून पुढे आलेल्यांची संघर्षगाथा या पुस्तकात मांडली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र असताना पत्रकार बाबतचे हिंसक प्रकार थांबले पाहिजे. त्याविरोधात सर्वांनी एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. राज्यातील पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर हल्ले यापुढे सहन करणार नाही. पत्रकारांच्या प्रत्येक लढ्यात माझा सहभाग राहील. पत्रकार यांच्यातील अनेक दुराग्रह या पुस्तकातून दूर होतील. सहजरीत्या भाषेत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. समाजातील वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार कार्यरत असतात.

'ध 'चा 'मा 'करणे वेदनादायी

आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असतो परंतु 'ध 'चा 'मा 'करणे वेदनादायी असते. मी कार्यक्रम स्वीकारले तर कधी शक्यतो टाळत नाही. ज्यांनी कार्यक्रम घेतले त्यांच्या उमेद असतात त्यामुळे त्यांना निराश करणे योग्य नाही असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले.

कृत्रिम पाऊस प्रयोगाचे किस्से

2003 मध्ये राज्यात मोठा दुष्काळ आला होता. कृत्रिम पाऊस प्रयोग राबविण्याचे ठरले होते. मी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री होतो आणि पवनचक्कीमुळे ढग आडले जाऊन पाऊस पडत नाही असे निवेदन स्थानिकांनी दिले होते. त्यावेळी शाम दौंडकर यांनी ही कृत्रिम पाऊस प्रयोग मध्ये सहभाग घेतला आणि ढगावर मीठ टाकण्याचे काम केले. नंतर कितीजणांचा जखमेवर मीठ चोळले असे अजित दादा यांनी सांगताच सभागृहात हशा पसरली.