आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुषार हंबीरचा काटा काढण्याचा प्रयत्न:हल्ल्यासाठी रेकी करणार्‍या मुख्यसूत्रधाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ससून रूग्णालयात दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार तुषार हंबीरवर हल्ला करण्यासाठी रेकी करणार्‍या शोयब शेख टोळीतील तडीपारासह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने बेड्या ठोकल्या आहे.

प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे (22, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, आकाशवाणी) आणि ऋतिक उर्फ बबलु राजु गायकवाड (19, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, आकाशवाणी,समोर हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

दि. 7 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेतील युनिट 5 चे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर व स्टाफ हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंगसाठी फिरत असताना पोलिस अमंलदार यांना सराईत गुन्हेगार वाघमारे आणि गायकवाड यांच्या विषयी माहिती मिळाली होती. तसेच ते कॅम्पातील सिल्व्हर ज्युबली पेट्रोल पंपाजवळ थांबले असल्याचे समजले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या नोन्यावर 10 गुन्हे दाखल आहेत.

दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांना अटक करण्याची कारवाई वरिष्ठ पोलिस हेमंत पाटील, पोलिस अमंलदार अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने ही करावाई केली.

टक करण्यात आलेला नोन्या हा शोयब शेख यांची टोळी चालवत होता. तर वर्मा टोळीतील सागर ओव्हाळ आणि बालाजी ओव्हाळ यांची एकमेकांशी चांगली ओळख असल्याने सर्वजण हंबीरचा काटा काढण्यासाठी एकत्र आले होते. त्यातच नोन्या आणि गायकवाड यांनी हंबीरची रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.ससून रुग्णालयात झालेल्या या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना यापूर्वी अटक केली आहे.

सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ ,सुरज शेख, सागर आटोळे या चौघांना गार्डन पोलिसांनी अटक केली.अटक केलेल्या आरोपींचा मृत असलेला मित्र सुजित वर्मा याच्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात जीवघेणा हल्ला केला होता.

बातम्या आणखी आहेत...