आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात मागील दाेन वर्षांच्या कालावधीत माेठया प्रमाणात माेक्का आणि एमपीडीए कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारीस आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यानंतर ही दिवसेंदिवस पुन्हा गुन्हेगारी वाढताना दिसत असून पुण्यातील सिंहगड राेड परिसरात स्वाीट मार्टच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलेल्या दाेन तरुणांना काजू कतली मिठाई दुकानदाराने फुकट न दिल्याने त्यांनी थेट दुकानात गाेळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हल्लाप्रकरणी पोलिसांनी दाेन आराेपींचा शाेध घेऊन त्यांना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे. मात्र, या घटनेने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सूरज ब्रहमदेव मुंढे (वय-23,रा.माणिकबाग,पुणे) यास अटक करण्यात आली असून त्याचा 17 वर्षाचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती सिंहगड राेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली आहे.
सदरची घटना 19 डिसेंबर राेजी दुपारी चार वाजता सिंहगड राेडवरील फुलपरी स्वीट माॅल याठिकाणी घडलेली असून त्याबाबत दुकान मालक जाेधाराम धिसाजी चाैधरी (वय-50, रा.दत्तवाडी,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जाैधारास चाैधरी हे दुकानात काऊंटरवर बसलेले असताना, आराेपी सुरज मुंढे हा त्याचा साथीदारासह दुकानात आला. त्यांनी एक किलाे फुकट काजु कतलीची दुकानदारास मागणी करुन त्याचे पैसे मिळणार नाही असे सांगितले.
परंतु दुकानदाराने फुकट मिठाई देण्यास विराेध दर्शवला असता, आराेपींनी त्यांचेकडील पिस्तुल बाहेर काढून ते दुकानाचे मालकावर राेखुन त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने एकूण चार वेळा ट्रिगर दाबून फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे पिस्तुलमधून एकही गाेळी फायर न झाल्याने दुकान मालकास काेणतीही जखम झाली नाही. परंतु आराेपींकडून फायर करताना एक राऊंड दुकानात खाली पडल्याने पडलेला राऊंड घेवून ते त्यांचे माेटारसायकलवरुन पळून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची घटना दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत, दाेन आराेपींचा शाेध घेऊन त्यांना जेरबंद केले आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस लाेहार करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.