आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाहेरहून 20 लाख रुपये आणत नसल्याने पतीने पत्नीला बळजबरी फिनेल पाजत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ,पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे आरोपी योगेश काळभोर याच्यासोबत 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पती तिला वारंवार माहेरहून पैसे घेवून येण्यास सांगत होता. यासाठी तो तिला मारहाण तसेच मानसिक छळही करत होता. बुधवारी (ता. 8) पत्नी किचनमध्ये काम करत असताना आरोपी किचनमध्ये आला व त्याने माहेरहून 20 लाख रुपये कधी घेवून येणार, अशी विचारणा केली. त्यास पत्नीने उत्तर न दिल्याने रागाच्या भरात आरोपीने पत्नीस मारहाण करुन पकडून खाली पाडले. त्यानंतर बळजबरीने तिला फिनेलची बाटली पाजण्याचा प्रयत्न करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करुन सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती जिवन काळभाेर, दिर याेगेश काळभाेर व सासू सुनंदा काळभाेर यांच्या विराेधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाेणीकाळभाेर पाेलिस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.