आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला राग:पाणी न दिल्याने सलून दुकानदाराचा खून करण्याचा प्रयत्न; संशयितावर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी पाणी प्यायला न दिल्याच्या रागातून सलून दुकानदारावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 11 डिसेंबरला ही घटना घडली. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला होता.

याप्रकरणी सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे (रा. शनिनगर,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे याबाबत स्वप्निल पंढरीनाथ तावरे (27, रा. दुगड शाळेच्या समोर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील तावरे हे त्यांच्या आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी येथील शिवस्व मेन्स पार्लर येथे दि. 11 डिसेंबर रोजी असताना संशयीत आरोपी तेथे आले. त्यांनी तावरे यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली मागितली. त्यावर तावरे यांनी दुकानात पाणी नाही असे सांगितले. त्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकी दिली त्यानंतर तावरे हे डबा घेऊन पावणे अकरा वाजता डबा घेवुन आले. त्यावेळी आरोपी अचानक त्या ठिकाणी आले. त्यांनी तावरे यांना शिवीगाळ करत त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून एकाने त्याच्याकडील कोयत्याने डोक्यात तसेच गळयावर वार करून खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

नांदण्यासाठी येत नसल्याने पत्नीवर कुर्‍हाडीने वार

नांदण्यासाठी घरी न येणार्‍या पत्नीवर सासरी जाऊन पतीने कुर्‍हाडीने वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना फुरसुंगीत घडली. याप्रकरणी पती चेतन जंगले याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. दि. 12 डिसेंबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोघांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला आहे.

परंतु, कौटुंबिक कारणावरून पत्नी आईकडे गेली होती. चेतन याने त्यांच्या घरी जाऊन तू घरी का येत नाही असे म्हणत वाद घातला. तुझा मर्डरच करतो असे बोलून त्याने कुर्‍हाडीने वार केले. तक्रारदार यांची आई मध्यस्थी करण्यास आल्यानंतर त्यांच्या डोक्यातही कुर्‍हाडीने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...