आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मुलंही असुरक्षित:दहा वर्षाच्या मुलावर दोघांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न​​​​​​​​​​​​​; दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत खेळत असलेल्या दहा वर्षाच्या मुलाला रिक्षात बोलावून दोघांनी मिळून त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी दोघांवर गुरवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

पिडीत मुलाच्या आईने या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वप्नील नंद शिंदे (वय 25) आणि 17 वर्षाचा एक विधीसंघर्शित मुलगा (दोघेही रा. मोरवाडी,पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वप्नील शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाहेर मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला रिक्षामध्ये बोलावून घतले. दोघांनी मिळून पिडीत मुलाचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रय़त्न केला. त्याचवेळी तेथे गल्लीतील काही मुले आल्याने आरोपींनी पिडीत मुलाला सोडून दिले.याबाबत पिंपरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

तरूणीला शरीर सुखाची मागणी

कॉलेजमध्ये काम करणार्‍या तरूणीचा पाठलाग करून तिला गेटवर गाठून गुप्तांग दाखवत शरीर सुखाची मागणी करणार्‍या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. याबाबत एका 22 वर्षीय तरूणीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या गेटवर घडला. यावेळी दोन आरोपींनी तिचा पाठलाग करून हा घृणास्पद प्रकार केला. हा प्रकार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत घडला. त्यानंतर तरूणीने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...