आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिसला ग बाई, दिसला':पुण्यात महिलांसाठी आयोजित खास धुळवड कार्यक्रमात चित्रा वाघ यांची हजेरी, सेल्फी व्हिडिओच्या माध्यमातून टिपला सोहळा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुलीवंदनानिमित्त राज्यातील सर्वच नेत्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावून होळीचा आनंद द्विगुणित केला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील पुण्यात आयोजित 'रंगवर्षा 2022' कार्यक्रमात हजेरी लावली.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील नगरसेवक तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे आणि सोनाली हिंगे यांनी धुलीवंदनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी धुळवड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरंभ सोशल फाउंडेशन आयोजित 'रंगवर्षा 2022' नावाच्या या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. खास मराठी गाण्यावर ठेका धरत महिलांनी होळीचा आनंद लुटला. या कार्यक्रमात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही हजेरी लावली.

मराठी गाणे आणि महिलांचा ठेका

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमात उपस्थित महिला मराठी गाण्यावर ठेका धरत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या वतीने होळी साजरी करण्याच्या नियमावलीत बदल करण्यात आला होता. दोन वर्षांपासून कोरोना नियमावली आणि लाॅकडाऊन मुळे होळी साजरी करता आली नव्हती. यंदा मात्र सर्व नागरिकांनी उत्साहात होळी साजरी केली.

बातम्या आणखी आहेत...