आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:दगडूशेठ मंदिरावर फुलांमधून साकारली शेषनागाची आकर्षक प्रतिकृती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतीची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रूप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला.

...आणि मूषक वाहन तयार करण्यात आले
गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुराचा वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषक असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...