आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे माहेर असलेल्या एका 33 वर्षीय विवाहितेचा पुण्यात राहणाऱ्या 65 वर्षीय सासऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपी सासऱ्या विराेधात पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पाेलिसांनी विनयभंगचा गुन्हा दाखल केल्याची माहिती बुधवारी दिली.
सदरचा प्रकार 1 जानेवारी राजी साडेअकरा वाजता घडला. पिडित महिलेने सासरचे कुटुंबातील सदस्या विरुध्द औरंगाबादमध्ये 7 नोव्हेंबर 2022 राेजी काैटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रार दिल्याने पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल केल्यापासून तक्रारदार औरंगाबादेत त्यांच्या आईकडे राहत आहे.
तक्रारदार या सणानिमित्त मुलांना घेऊन पुण्यातील सासरच्या घरी आल्या हाेत्या. त्यावेळी सासऱ्याने त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करुन, महिलेच्या मनाविरुध्द अंगावरील ओढणी खेचून खाली टाकून त्यांना कमरेस पाठीमागुन डाव्या हाताने पकडून स्वत: जवळ जाेरात ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले. याप्रकरणी येरवडा पाेलिस ठाण्याचे महिला पाेलिस उपनिरीक्षक एस. चाटे पुढील तपास करत आहे.
विद्यार्थीनीचा पाठलाग करणारा तरुण जेरबंद
नऱ्हे परिसरातील एका नामांकि महाविद्यालयाचे शाळेत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय मुलीचा एक तरुण 30 डिसेंबर ते तीन जानेवारी दरम्यान दरराेज राहत्या घरापासून शाळेपर्यंत जाताना तिचा विनयभंग करण्याचे उद्देशाने पाठलाग करत हाेता. त्यामुळे ही बाब मुलीने पालकांना सांगितल्यावर, त्यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात धाव घेऊन पिडित मुलीच्या 35 वर्षीय आईने आराेपी विराेधात तक्रार दिल्यावर पाेलिसांनी शादाब युसुफ मुल्ला (वय 19,रा.उरळीकांचन,पुणे) या तरुणास अटक केली आहे. सिंहगड राेड पाेलिस याबाबत पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.