आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा:औरंगाबादची रिया ठरली चॅम्पियन,  श्रद्धा, अल्फियाला सुवर्णपदक; रियाचा सुवर्णवेध

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूरच्या लांब पल्ल्याच्या धावपटू श्रद्धा हाके व अल्फिया शेख गुुरुवारी महाराष्ट राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये नाशिकच्या कविता लाडने कांस्यपदकाची कमाई केली. तसेच औरंगाबादच्या रिया थत्तेने महिलांच्या गटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. करमाळा येथील अल्फियाने बांबू उडी या प्रकारात २.४५ मीटरचे अंतर गाठत सुवर्णपदक पटकावले. या गटात कोल्हापूरची सानिया कंजार (२.४० मी.) राैप्यपदक विजेती ठरली. अनुभवी धावपटू कालिदास हिरवेने पुरुषांच्या १० हजार मीटरमध्ये साेनेरी यशाचा पल्ला गाठला. त्याने सहकारी बाळू पुकळे व विवेकला मागे टाकले. पुण्याच्या स्वराज भोंडवेने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण तर औरंगाबादच्या रिया थत्तेने महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. नाशिकची राष्ट्रीय धावपटू यमुना लडकतने महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिने २ मिनिट ५.९२ सेकंदात हे अंतर गाठले. महिला विभागात एमए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी रेश्मा केवटे ही महिलांच्या १० हजार मीटर ही सुरुवातीच्या काळात शेतात म्हशींचा पाठलाग करत असे. तिने ३६ मिनिट ५९.११ सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले. यामुळे प्राजीला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच सानिका रुपनारने कांस्यपदक पटकावले. सुदेष्णा शिवणकरने स्प्रिंट दुहेरीत २०० मीटरचा मुकुट पटकावला.

स्नेहाची सुवर्ण उडी : औरंगाबादच्या १९ वर्षीय स्नेहा मदनेने महिलांच्या तिहेरी उडीत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने ११.५० मीटरची उडीत घेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यादरम्यान तिने आपली सहकारी कल्पनाला मागे टाकले. त्यामुळे कल्पनाला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. सत्यजित पुजारीने ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण व ओंकारने रौप्यपदक पटकावले.

राज्यात नव्याने १२२ क्रीडा संकुले : मुख्यमंत्री राज्यात सध्या १५५ क्रीडा संकुल असून आणखी १२२ क्रीडा संकुल नव्याने उभारण्यात येतील. राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत राज्य सरकारने पाचपट वाढ केलेली आहे. खेळ खेळल्याने शरीर आणि मन सक्षम होऊन विविध आव्हाने खेळाडूंना पेलता येतील असे मत व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते गुरुवारी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यादरम्यान त्यांनी डेटाबेसच्या माध्यमातून खेळाडूंची गुणवत्ताही तपासणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...