आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:BMW कारवर लघवी करताना हटकल्यामुळे गार्डला पेट्रोल टाकून जाळले, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ऑटो ड्रायव्हरला लघवी करण्यापासून हटकणे एका सिक्योरिटी गार्डला चांगलेच महागात पडले आहे. आरोपी ऑटो ड्रायव्हरने गार्डवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी आरोपी ऑटो ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षा चालक एका बीएमडब्लू कारवर लघवी करत होता. यादरम्यान, तेथे ड्युटीवर असलेले सुरक्षा गार्ड शंकर भगवान वाइकर (41) यांनी आरोपी महेंद्र कदम(31) याला लघवी करण्यापासून रोखले. यानंर आरोपी आणि शंकर यांच्यात बाचाबाची झाली. काही तासानंतर आरोपी पेट्रोल घेऊन आला आणि शंकर यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत शंकर वाइकर 30% भाजले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात आरोपी गार्डला आग लावून पळून जाताना दिसत आहे. आरोपीने गार्डला आग लावताच गार्डने पळत जाऊन रस्त्याशेजारी असलेल्या नाल्यात उडी घेतली आणि आपला जीव वाचवला.

बातम्या आणखी आहेत...