आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखराडी परिसरात सिग्नल दुरुस्ती करणार्या एका तरुणाची मोटार चोरुन नेणारा आरोपी सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्यानंतर त्यास चंदननगर पोलिसांनी शोध घेऊन सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाखांची मोटार जप्त करण्यात आली आहे. रामेश्वर अर्जुन मिस्कीन (वय 26 रा सरडेवाडी, ता इंदापुर,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चंदननगर पोलिसांकडे तक्रार दाखल केलेले तक्रारदार आणि त्यांचे चार कामगार खराडी बायपास चौकातील सिग्नल दुरुस्तीचे काम सहा मे रोजी करत होते. त्यावेळी त्यांनी हॉटेलजवळ उभी केलेली मोटार अज्ञात चोरट्याने परस्पर चोरुन नेली.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिस तपास करीत होते. 7 मे ला पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले आणि पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिस अंमलदार नामदेव गडदरे व प्रदिप घोडके यांना मोटार चोरीच्या आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून पाठलाग करीत आरोपी रामेश्वरला ताब्यात घेतले आहे.
चौकशीत त्याने मोटार चोरीची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, नामदेव गडदरे, संतोष शिंदे, गजानन पवार, नितीन कांबळे, प्रदिप घोडके, विजय गायकवाड यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके हे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.