आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीनंतर ईडीचा दणका:अविनाश भोसलेंची 40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; राजकीय नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या कारवाईबाबत नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांच्या कुटुंबीयांची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी ) तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. फेमा (परकीय चलन विनिमय कायदा) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी भोसले यांची मुंबई कार्यालयात तब्बल आठ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने त्यांच्या पुण्यातील कार्यालयावर छापे टाकले आहेत. तसेच त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वीच्या विदेशी चलन प्रकरणात हे छापे टाकण्यात आले होते.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत पुणे व नागपूर येथील मालमत्तेचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयबीच्या परवानगीशिवाय विदेशी बँकेतील अकाउंटमध्ये ५०० कोटी कसे जमा झाले या संशयावरून हा छापा टाकण्यात आला होता. दरम्यान, ईडीने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अविनाश भोसले व त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ४० कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या कारवाईबाबत नमूद करण्यात आले आहे.

राजकीय नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध
राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध असलेल्या अविनाश भोसले यांनी विविध ठिकाणी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या सलगीमुळे भोसले कायमच चर्चेत राहिले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय व्यक्तींच्या घरावर सक्त वसुली संचालनालयाने छापे टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. एकंदर राज्य व केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष ईडीच्या कारवाईने समोर आल्याचेही बोलले गेले होते. त्यातच आता भोसले यांची मालमत्ता फेमा कायद्यानुसार जप्त करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...