आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या लेकराला कुत्र्यांसोबत कोंडल्याचे प्रकरण:आई-वडिलांना जामीन मंजूर; ॲड. असीम सरोदे यांनी मांडली बाजू

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अकरा वर्षाच्या मुलाचे वागणे श्र्वाना प्रमाणे आहे, आई वडिलांनी घरात 20-22 भटके कुत्रे पाळले व त्या कुत्र्यांन सोबतच मुलाला ठेवल्याने त्याची वर्तणूक कुत्र्या प्रेमाने झाली इत्यादी स्वरूपाची अतीरंजित महिती पसरवून हे प्रकरण सनसनाटी करण्यात आले असा युक्तीवाद ॲड.असीम सरोदे यांनी मंगळवारी न्यायालयात केला. कोंढवा पोलिस स्टेशनने दाखल केलेल्या गुन्ह्यात आई-वडिलांना जामीन देण्यात यावा आशी मागणी करण्यासाठी ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात केली.न्या. आर. एन. हीवसे यांनी याप्रकरणी आई-वडिलांना प्रत्येकी 15 हजार रुपये जतमुचालक्यवर जामीन मंजुर केलेला आहे.

कुत्रा चार पायांवर चालतो व जिभेने अन्न पाणी ग्रहण करतो तसे काहीही हा मुलगा करीत नाही व तसे काही पुरावे प्रथमदर्शनी सादर केलेले नाहीत. मग हा मुलगा कुत्र्यांसारखा वागतो अश्या बातम्या पसरून नेहमीसाठी या मुलाच्या चारित्र्याची व मानवी अस्तित्वाची बदनामी घडवून आणण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर कुणी केला याचा शोध घेतला पाहिजे असा आरोप ॲड. असीम सरोदे यांनी केला. या केसमधून कुणी काय साध्य केले? मुलाच्या आई वडिलांना मुलापासून वेगळे करण्यात आले, मुलाला काहीही कारण नसतांना बाल कल्याण समितीने ताब्यात घेतले व पाळीव कुत्र्यांना स्ट्रे डॉग्स असे लेबल लावून प्राणी रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेने ताब्यात घेतले व कुत्र्यांसाठी काम करण्याचे दाखवून लाखो रुपये जमा करणे सुरू केले असे सांगून ॲड. सरोदे म्हणाले की मुलगा, कुत्रे, आई-वडील सगळ्यांवर अन्याय करून त्यांचे गुन्हेगारीकरण करणारे हे प्रकरण आहे.पोलिसांना हाताशी धरून प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने ही खोटी केस दाखल केली. भा.द. वी. 308 नुसार मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आश्चर्यकारक गून्हा केवळ पाळीव कुत्रे व मुलगा यांना घरी एकत्र ठेवले म्हणून आई वडिलांवर नोंदवण्यात आला.

मागील अडीच वर्षांपासून हे कुत्रे, मुलगा व ते आई-वडील एकत्र राहतात, त्यामूळे त्या कुत्र्यांना भटके कुत्रे म्हणता येत नाही कारण ते पाळीव कुत्रे होते. प्रत्यक्षात 11 च कुत्रे असताना 22 कुत्रे असल्याचे पसरविण्यात आले.

लहान मुलाला ताब्यात घेतांना बाल-मानसोपचार तज्ञ सोबत नसणे ही गंभीर बेकायदेशीरता आहे व मुलाचा जबाब बाल-मानसोपचार तज्ञाने न नोंदवणे ही कायदेशीर अनियमितता आहे .या संदर्भात कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व इतर पोलिस सहकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका करण्यात येईल अशी माहिती सुद्धा ॲड. असीम सरोदे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...