आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:बजाज हे कोविड किंवा मेडिकल एक्स्पर्ट नाहीत, देवेंद्र फडणवीसांचे राजीव बजाज यांना प्रत्युत्तर

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सारखी भूमिका बदलत राहतात'

लॉकडाऊन हे राक्षसी आणि चुकीचे होते, असे मत नुकतेच बजाज उद्योग समूहाचे उद्योगपती राजीव बजाज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना व्यक्त केले होते. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, बजाज हे ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने स्कूटर, रिक्षा, कार कशी असावी याबाबत त्यांचा सल्ला घेणे योग्य आहे. परंतु ते कोविड किंवा मेडिकल तज्ज्ञ नाहीत. लॉकडाऊन कशा प्रकारे राबवावा हे सांगण्यासाठी ते तज्ज्ञ नाहीत. अर्थात लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

उद्धव हे भूमिका बदलतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सारखी भूमिका बदलत राहतात. महाराष्ट्राने केंद्राच्याही आधी लॉकडाऊन जाहीर केला. तरीही ते केंद्राने लॉकडाऊन घाईघाईने केला असे सांगतात. केंद्राकडे बोट दाखवणे बंद केले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...