आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे कुटुंबीयांवर शोककळा:बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनींचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांचे वय 84 होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. संध्याकाळी त्यांच्या अंत्यसंस्काराला ठाकरे कुटुंबिय उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल दाखल केले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या. संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 38 वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...