आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:बाळासाहेब ठाकरेंच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे निधन

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर (८४) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत कीर्ती फाटक यांनी अंत्यसंस्कार केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या त्या आत्या, तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...