आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर हे आपल्या वादग्रस्त वस्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहे. सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली होती. यानंतर त्यांनी माफी देखील मागितली. मात्र तरीही त्यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या बंडातात्यांवर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधामध्ये दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडतात. याचे पुरावे देखील आहेत असे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यासोबतच राज्यातील महिला नेत्यांबद्दलही वादग्रस्त टिप्पणी केली होती. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.
या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर महिला आयोगाने देखील बंडातात्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. यानंतर पोलिसांनी हालचाली करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गुरुवारीच बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलिस बंदोबस्त ठेवला. यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना मठातून ताब्यात घेण्यात आले आहे. साताऱ्यामधील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?
नेत्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे , सुप्रियाताई सुळे यांच्याविषयीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिले होते. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असे देखील ते म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी कराडकर म्हणाले की, बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, 'ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे'. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.