आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी 13 डिसेंबर पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील 36 गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
अण्णा थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. देशातील इतर सर्वच महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे व या सर्वांचे देशाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्हाला भान आणि अभिमान हे दोन्ही आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अपमानास्पद व्यक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या असून, या गोष्टीचा आम्ही खेदजनक निषेध व्यक्त करीत आहोत, खेदजनक यासाठी कारण आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल विधाने करीत आहेत.
यापुढे कधीही कोणत्याही व्यक्तीने मग ती राजकीय असो किंवा अराजकीय, छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल एक शब्द जरी चुकीचा किंवा अपमानास्पद काढला, तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी व भविष्यात छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना याचे भान राखावे, असे आवाहनही यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रसरकरने राज्यपाल कोशारी यांची तातडीने हकालपट्टी करावी कोशारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी या मागणीसाठी उद्या मंगळवारी पुणे बंद व मुकमोर्चा आयोजित केला आहे. उद्या मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चास प्रारंभ होणार आहे डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे या मोर्चात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.