आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटा लीक:अनघा माेडक हीच मास्टरमाइंड, तिनेच इतरांना पुण्यात बोलावले; शर्मा, संधू, मोडक यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतील डॉरमेंट खात्याची (निष्क्रिय खाती) गोपनीय माहिती मिळवून त्यातील २१६ कोटी २९ लाख रुपये परस्पर वळवण्याच्या कटात सहभागी झाल्याबद्दल औरंगाबादच्या एका चॅनलचे मालक राजेश शर्मा, परमजित संधू आणि पुण्यातील स्टॉक ब्रोकर अनघा मोडक यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस.मुजुमदार यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, अनघा मोडक हीच मास्टरमाइंड असून तिनेच सर्वांना पुण्यात बोलावले होते.

दरम्यान, या गुन्ह्यात पुण्यातील स्टाॅक ब्रोकर सुधीर भटेवरा याच्याकडे २५ लाख सापडूनही त्याला केवळ नोटीस देऊन पोलिस चौकशी करत आहेत. तपासात त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करू, असे सांगत आहेत. मात्र, या गुन्ह्यात सर्व जण पोलिसांना सहकार्य करत असूनही त्यांना अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद शर्मा आणि संधू यांचे वकील जितेंद्रलाल गोरणे यांनी न्यायालयात केला. युक्तिवादादरम्यान ते म्हणाले, आरबीआयच्या माहितीनुसार देशभरातील बँकांच्या डॉरमेंट खात्यात साडेतीन लाख कोटी रुपये पडून आहेत. वर्षभरात ज्या बँक खात्यात व्यवहार न होता ती निष्क्रिय झाली त्याची माहिती बँकेने गोळा करणे आवश्यक असून संबंधित लोकांना नोटीस बजावली पाहिजे.

डॉरमेंट खात्याची हॅकर्सच्या मदतीने माहिती मिळवणे सोपे काम नाही. त्याबाबतची दक्षता बँकांनी घेतलेली असते. कुणीही अनधिकृतरीत्या बँक खात्यात प्रवेश केल्यास त्यासंदर्भात चाैकशी करून कारवाई करत ही खाती सीझ केली जातात आणि जाेपर्यंत संबंधित व्यक्ती बँकेत प्रत्यक्ष येऊन केवायसी माहिती देत नाही ताेपर्यंत ही खाती पुन्हा सुरू केली जात नाहीत. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक यांची या प्रकरणात फसवणूक झाली नसून त्यांची काेणतीही तक्रार नाही. शर्मा आणि संधू यांनी दाेन वर्षांपूर्वी चॅनल सुरू केले हाेते व काेविडमुळे त्यांना आर्थिक नुकसानीस सामाेरे जावे लागले. भटवेरा यांच्याशी आेळख असल्याने व ते फायनान्स कन्सल्टंट असल्याने शर्मा व संधू त्यांना भेटण्यास आले होते. या वेळी त्यांना पाेलिसांनी अटक केली.

अनघा माेडक डेटा पोहोचवण्याचे काम करायची
पाेलिसांनी न्यायालयात सांगितले की, अनघा माेडक हिनेच या गुन्ह्यात इतर आराेपींना एकत्रित पुण्यात बाेलावले. तिचे साथीदार काेण याचा तपास करावयाचा आहे. बँकांचा महत्त्वपूर्ण डेटा तिला कुणाकडून मिळणार हाेता व हा डेटा ती कुणाकडे देणार हाेती, याबाबत माहिती मिळवणे आवश्यक आहे. माेडक ही डेटा मिळवणे व ताे संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत हाेती. मुकेश माेरे, राजशेखर मामिडा व सुधीर भटेवरा यांनी डेटा विकत घेण्यासाठी कुणाकडून पैसे घेतले तसेच त्यांना मिळणारा बँकांचा डेटा ते कुणाला देणार होते याचीही चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...