आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह कर्जाचा व्याजदर:बँक ऑफ महाराष्ट्रने घटवला गृह कर्जाचा व्याजदर; नवे दर 8.40 टक्के

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने १३ मार्चपासून गृह कर्जावरील व्याजदरात कपात केली. आता गृह कर्ज ८.४० % या नवीन व्याज दराने मिळेल. हा व्याजदर सगळ्या बँकिंग उद्योगात सर्वात कमी आहे. बँकेने निमलष्करी दलांसह देशाच्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष दर विहित केला असून वेतन व निवृत्तीवेतन संवर्गातील कर्जदारांच्या गृह कर्जांना या घटलेल्या व्याज दराचा लाभ होणार आहे. फेस्टिवल धमाका ऑफर अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रने सुवर्ण, गृह व चारचाकी वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. बँकेने कर्जासाठी आकर्षक व्याजदर देऊ केली असून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचा लाभ झाला .

बातम्या आणखी आहेत...