आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील राजकारण विविध घडामोडींनी सध्या ढवळून निघाले असल्याने विकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अशावेळी नेमकी पंढरपूरच्या आषाढी वारीच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार यावरून चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.' विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे आणि त्यांना महापूजेचा मान मिळू दे' अशा प्रकारचे बॅनर पुण्यात वारीच्या मार्गावर लावल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील भाजपचे पदाधिकारी प्रकाश सोलंकी आणि रवींद्र साळेगावकर यांनी वारीच्या मार्गावरील शिवाजीनगर भागात पाटील इस्टेट परिसरात अशा संदर्भातले बॅनर लावल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वारकरी आणि नागरिक उत्सुकतेने बॅनर पाहत आहे.' हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे' अशा प्रकारचा आशय लिहिलेला मोठा बॅनर शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या खालील भागात लावण्यात आलेला आहे. या बॅनरवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा पंढरपूर येथील महापूजा करतानाचा फोटोही लावण्यात आलेला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीने भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि मुंबईत हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच सेनेचे ज्येष्ठ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी अटच शिवसेनेच्या नेतृत्वाला घातली आहे. त्यामुळे खरंच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का आणि त्यांना पंढरपूरच्या आषाढी वारी महापूजाचा मान मिळणार का? अशी उत्सुकता लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.