आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बारामती तालुक्यात मालाड गावातील शेतकऱ्यांनी आव्हानांना न घाबरता त्याचे संधीत रूपांतर केले. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र व्यवसाय ठप्प होते तेव्हा इथे शेतकऱ्यांनी भाज्या व दुधाच्या व्यवसायाचे नवे मॉडेल उभे केले. उत्पन्न दुपटीने वाढवले. या भागात शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने “घर सेवा’ हे अॅप तयार केले. या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत भाज्या, दूध व अंडी पोहोचवली जात आहेत. शेतकरी प्रशांत शिंदे सांगतात, “लॉकडाऊनमध्ये दलालांनी दूध-भाज्यांसाठी गावात येणे बंद केले. आम्ही ठरवले की, भाज्या फेकून न देता स्वस्त दरात विकू. मग आम्ही काही लोक लपतछपत जवळच्या अपार्टमेंट््समध्ये गेलो.
आमच्याकडून भाज्या घ्याल का म्हणून विचारणा केली. सुरुवातीला कमी मागणी होती. मग आम्ही भाज्यांचे बास्केट द्यायला सुरू केले. हळूहळू लोक आमच्याकडे धान्य आणि दुधाची मागणी करू लागले. ग्राहक आणि शेतकरी यातून व्यापारी बाजूला झाल्याने आमची कमाई दुप्पट झाली. त्यामुळे आम्ही इथे रोज १ हजार ते ४ हजार रुपये कमावत आहोत. उच्च दर्जाच्या ऑर्गेनिक भाज्या इथे पिकत असल्याने लॉकडाऊनमध्ये येथील शेतकऱ्यांनी १.६ टन भाज्या ब्रिटनला पाठवल्या. यात भेंडी, हळद, शेवग्याचा समावेश आहे. यासाठी आम्ही एक्स्पोर्ट कंपनीमार्फत भाज्याचे नमुने पाठवले होते. तपासणी करून ब्रिटनने ऑर्डर दिली.’ येथे वनराजा म्हणून देशी कोंबड्या पाळल्या जातात. डॉ. रतन जाधव यांच्यानुसार, त्या एका दिवसात दुप्पट म्हणजे २५ अंडी देतात. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शाकीर अली म्हणाले, लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतकऱ्यांना भाज्यांची ३ लाख रोपे दिली. अनेक देशांच्या मदतीने येथे काही संशोधन प्रकल्पही सुरू आहेत. जगातील नामांकित कंपन्या येथे शेतकी उत्पादनातून बायोप्रॉडक्ट तयार करतात. येथे दरवर्षी १२ ते १५ हजार पर्यटकही येतात. कृषी केंद्राच्या वतीने आता अॅग्रो एज्युकेशन टुरिझम प्रकल्प सुरू केला जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.