आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारामती:साखर कारखान्यातील टँक साफ करताना गॅस लीक; 6 मजुरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

बारामतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांनी सांगितले की, सर्व मजुर सध्या ठीक आहेत

बारामतीमधील एका साखर कारख्यान्यात गॅस लीक झाल्याने 6 मजुरांची तब्येत बिघडली. सर्व मजुरांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, सर्व मजूर सध्या ठीक आहेत. दुर्घटनेवेळी फॅक्टरीत 13 मजूर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कारखान्यातील टँकची सफाई करतेवेळी हा गॅस लीक झाला. घटना सकाळी 9 वाजता घढली. गॅस लीक होताच 6 मजूर चक्कर येऊन पडले, त्यानंतर संपूर्ण फॅक्टरी बंद करण्यात आली. या सर्व मजुरांना जवळील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची तब्येत ठीक आहे.

विशाखापत्तनममध्ये गॅस लीक होऊन 11 जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथील हिंदुस्तान पॉलिमर कंपनीच्या एका प्लँटमध्ये गॅस लीक होऊन 5 हजारांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले होते. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...