आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Baramatikar Will Support Prime Minister's Dreams, BJP State President Claimed; In 2024, No One Will Know When The Sand Has Shifted

पंतप्रधानाच्या स्वप्नांना बारामतीकर साथ देतील:भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला दावा; 2024 मध्ये कुणाच्या पायाखालची वाळू सरकली ते कळेल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना 2024 च्या निवडणुकीत बारामतीकर साथ देतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी बारामती जिंकण्यावरून बावनकुळेंवर टीकास्त्र डागले होते. त्याला बावनकुळेंनी उत्तर दिले.

काय म्हणाले बावनकुळे?

2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर कोणाच्या पायाखालची जमीन सरकेल आणि कोण उद्ध्वस्त होईल् हे पाहू, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये भारताला अग्रेसर केले आहे आणि पुढच्या काळात 21 व्या शतकात मजबूत भारत बनवण्याचे स्वप्न जे बघितले आहे, त्या स्वप्नाला बारामतीकर नक्की साथ देतील असा मला विश्वास आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाडाचे ट्विट?

बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी पवारांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ शरद पवारांमुळे ​​​ बारामतीचा गड जिंकून दे असे साकडे बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातले. 60 वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?

आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत. विसर्जन करू म्हणता आहेत. अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…बारामतीचा गड जिंकून दे असे साकडे बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातले. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ? या शब्दात खिल्ली उडवली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगले. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...