आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:पैज लावून केला बार्शी- पुणे प्रवास; दोन तरुण क्वाॅरंटाइन; चाकणहून पोलिसांनी दाेघांना परत पाठवले 

बार्शीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बार्शी-पुणे प्रवास करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन ठेवले अलिप्त

तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील दोन तरुणांनी मित्रांमध्ये पैजा लावून पुणे येथे जाऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर बार्शी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जागोजागी पोलिसांची गस्त आणि खडा पहारा असतानाही फाजील आत्मविश्वास असलेले असे तरुण काहीतरी वेगळे करण्याच्या नादात स्वत:सह इतरांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. 

रविवारी बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी या गावातील काही तरुण मित्रांशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असतानाच त्यापैकी दोन तरुणांनी फाजील आत्मविश्वास व्यक्त करून पैजा लावून पुणे येथे जाऊन येऊन दाखवतो, असे सांगून ते आपल्या दुचाकीवर निघाले. दोघांनी पुणे येथील चाकण येथे जाण्यासाठी प्रवासही सुरू केला. त्यांना दुचाकीवरून जात असताना जागोजागी वाहन परवाना व कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. ते जसजसे पुण्याला जात होते तसतसे मोबाइलवरून आपल्या मित्रांना आपण आता कुठे आहोत याची वेळोवेळी माहितीही देत होते. मित्रांनी केलेल्या प्रतापाची वार्ता हळूहळू गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती 

मिळताच पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तत्काळ यंत्रणा सतर्क केली व त्या दोघांच्या सोबत असलेल्या दुचाकीचे आणि मोबाइलचे क्रमांक प्रसारित केले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अलिप्त ठेवण्यात आले.

चाकणहून पोलिसांनी दाेघांना परत पाठवले 

दोघेजण पुण्यात पोहोचले व चाकणकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी तेथूनच परत हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, बार्शी पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोबाइल उचलला नाही व नंतर बंद केला. पोलिसांनी सोमवारी दोघांना प्रवासादरम्यान दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना गावातील शाळेच्या इमारतीमध्ये क्वाॅरंटाइन करून ग्रामस्थांपासून अलिप्त ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...