आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाटीऀच्या गैरकारभाराची तत्काळ चौकशी करा:सर्जेराव वाघमारेंची मागणी, गैरकारभाराविरुद्ध भव्य जवाब दो आंदोलन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बाटीऀ ) येथील गैरकारभाराची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केली आहे. बाटीऀ ही संस्था गेली कित्येक वर्ष ज्या प्रकारे काम करीत आहे त्या प्रकारे कामकाज होत नाही .ही संस्था योग्य रित्या ई टेंडर प्रणाली नुसार कामे देत नसून नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालू असल्याचा आरोप वाघमारे यांनी यावेळी केला आहे .

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रम जवळ आला असून या कार्यक्रमाच्या बैठकांना स्थानिक लोक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टाळले जात असल्याची खंत ही वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली .बाटीऀच्या गैरकारभाराची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बाटीऀ या संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले .या आंदोलनात विविध पक्ष संघटनाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले.

महाराष्ट्रातील 'भारत जोडो'च्या छायाचित्रांचे प्रदर्शन

राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो' पदयात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात ही यात्रा दोन आठवडे चालली. त्यातील क्षणचित्रांचा आढावा घेणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन 8, 9 आणि 10 डिसेंबर 2022 या तीन दिवशी पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत या तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि. 8) दुपारी 4 वाजता बालगंधर्व कलादालनात ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते, आमदार संग्राम थोपटे व आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...