आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा करून त्याचा टीझर लाँच केला होता. या चित्रपटात प्रतापराव गुजर यांचे गाव भोसरे असताना कोकणातील गाव दाखवण्यात आले आहे. तसेच प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे असून त्यांची देहबोली प्रतापरावांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेशी अजिबात जुळत नाही. त्यांचा पेहरावसुद्धा दरोडेखोरासारखा दाखवण्यात आला आहे. मांजरेकरांनी या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जर या चित्रपटाला प्रदर्शित होण्याची परवानगी मिळाली तर ते अन्यायकारक आहे. इतिहासाचे विकृतीकरण त्यांनी तातडीने थांबवावे, अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे आणि भोसरे ग्रामस्थांच्या वतीने प्रतापराव गुजर यांचे वंशज गुजर यांनी दिला आहे.
सुरेश गुजर पुढे म्हणाले, महेश मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात इतिहासाचे विद्रूपीकरण केले आहे. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’ बनवण्याइतका सोपा नाही. खरा इतिहास जर दाबला जाणार असेल तर त्या चित्रपटांना अर्थ नाही. भोसरे हे खटाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा दर्जा असलेले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे गाव आहे. त्या जागी जर कोकणातील गाव दाखवले जात असेल तर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण होत आहे. इतिहासात प्रतापराव यांच्यासोबतीने विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे ही हुतात्म्यांची नावे आहेत. यांची नावे डावलून दत्ताजी पागे, जिवाजी पाटील, चंद्राजी अशी काल्पनिक नावे ठेवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.