आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावध राहा रूपेश !:मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, गाडीत अज्ञाताने ठेवली चिठ्ठी

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. अज्ञात व्यक्तीने रूपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवल्याचे आज उघडकीस आले. चिठ्ठीत 'सावध रहा रूपेश' असा मजकूर आहे. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे पोस्ट?

अज्ञाताचा शोध सुरू

वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. रूपेश हे वसंत मोरे यांच्या सोबत या रोजगार मेळाव्याला हजर होते. त्यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. यावेळी एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रूपेश त्यांच्या गाडीकडे आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रूपेश, अन्यथा असा धमकीवजा मजकूर लिहिलेला आढळला. हा प्रकार गंभीर असल्याने वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...