आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:सांगलीमध्ये जागेच्या वादातून मारहाण; 9 तरुणाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विट्यात जागेच्या वादावरून थेट डोक्याला पिस्तूल लावून एकास मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच घटनेतील मारहाण झालेल्या तरुणाविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जाधव याच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे. तुम्ही तुमच्या जागेतील हद्दीत बांधकाम करा, असे ते सांगत असताना पंकज दबडे, हर्षल निकम, अभि शिंदे यांनी स्वतः जवळील पिस्तूल जाधव याच्या डोक्याला आणि छातीवर लावून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जाधव याच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.