आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:शेजारी बनून जायचे अन् घर लुटून न्यायचे;इंजिनिअर पतीचा पत्नीसह घरफोडीचा उद्योग, दोघांनाही अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधुदुर्गच्या बंटी-बबलीस पुणे पोलिसांनी नागपुरात केले जेरबंद

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सुखाने व्यतीत करण्याचे अाजकाल तरुण-तरुणींचे स्वप्न असते. परंतु, ठाणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेल्या एका तरुणाने सुखवस्तू, चैनीचे जीवन जगण्यासाठी ‘बंटी-बबली’ चित्रपटाच्या धर्तीवर आपल्या हुशारीचा उपयोग लोकांना गंडवण्यासाठी केला. या तरुणाने आपल्या पत्नीसह घर भाड्याने घेऊन शेजाऱ्याचे घर फोडण्याचा उद्योग सुरू केला. अखेर बारामतीच्या एका शेजाऱ्याच्या तक्रारीमुळे या बंटी-बबलीचा भंडाफोड झाला अाणि नवनीत मधुकर नाईक (४०) व प्रिया नवनीत नाईक (३६, रा. भांडूप, पश्चिम मुंबई) या भामट्या जोडप्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे जाेडपे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे रहिवासी असून त्यांचा प्रेमविवाह अाहे.

बनावट किल्लीने शेजाऱ्याचे घर लुटले : तीन वर्षांपूर्वी २ डिसेंबर २०१८ रोजी बारामती येथील राहुल सदाशिव तावरे यांच्या घराशेजारी हे दांंपत्य भाड्याने खोली घेऊन राहण्यास आले. मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी राहुलसह त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. बाहेर जाताना कुलूप लावण्याच्या बहाण्याने त्यांनी तावरे यांच्याकडून कुलूप मागितले. दोन-तीन वेळा असे झाल्यावर एकदा बाहेर गेल्यानंतर त्यांनी तावरेंच्या कुलपाची बनावट किल्ली बनवून घेतली आणि एक दिवस तावरे यांच्या घरातील मंडळी काही कामानिमित्त बाहेर जाताच बनावट किल्लीच्या साहाय्याने घर उघडून ३ लाख ३६ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन बंटी-बबली पसार झाले. तावरेंनी पुणे पोलिसांत तक्रार दिली. तपासात नाईक पती-पत्नी नागपूरला घर भाड्याने घेऊन राहत असल्याचे कळाले. अखेर पथक रवाना झाले. जोडप्याला जेरबंद करून पुण्यास आणले.

नाशिक, नगर, सातारा, वाशीममध्येही गंडवले
या जोडप्याने पुणे शहर, ग्रामीण परिसर, सातारा, अमरावती, काेल्हापूर, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई, बंगळुरू, वाशीम, रत्नागिरी, नाशिक अादी जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातही अनेकांना गंडवल्याची कबुली दिली अाहे.

बातम्या आणखी आहेत...