आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी..., महागाईबाबत काँग्रेसचे स्मृती इराणींविरोधात आंदोलन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामार्फत पंतप्रधान मोदी यांना बांगड्यांची भेट पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिस व भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर महिला काँग्रेसने “तिरडी आंदोलन’ केले.

देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविणे, चूल व देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी अयशस्वी ठरले असल्याने स्मृती ईराणी यांच्या मार्फत त्यांना बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंदसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जवळपास ५ तास ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पूजा आनंद व कार्यकर्त्यांना सोडून दिले. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरासमोर तिरडीवर गॅस बांधून गॅसची अंत्ययात्रा काढली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त घोषणा दिल्या. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘ जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना?, हम सब एक है नरेंद्र मोदी फेक है अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...