आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घासून नाय तर ठासून आलोय!:पुण्याच्या भारती विद्यापीठ जवळ बॅनर लावून जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर व्हायरल होतेय बॅनर

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनकवडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाजवळील पादचारी पुलावर हे बॅनर लावण्यात आले आहे.

अमेरिकेत आता एका नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. जो बायडेन हे बुधवारी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले. तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. कमला हॅरिस इतिहास रचत अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. दरम्यान पुण्यातूनही हटके पद्धतीने या दोघांनाही शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

धनकवडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाजवळील पादचारी पुलावर हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लिहिलेला मजकूर जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. जो भाऊ बायडेन आणि कमला अक्का हॅरीस यांना शुभेच्छा असे यावर लिहिलेय. तसेच घासून नाय... तर ठासून आलोय... असेही यावर लिहिण्यात आले आहे.

बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी अत्यंत शांततेत पार पडला. पाच इंच बायबलवर हात ठेवून 35 शब्दांत शपथ घेतली. जोसेफ आर बायडेन जूनियर म्हणजेच जो बायडेन बुधवारी रात्री अमेरिकन इतिहासातील सर्वात वयस्कर अध्यक्ष बनले. ते 78 वर्षांचे आहेत. कमलादेवी हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. 56 वर्षाच्या कमला हॅरिस यांनी इतिहास रचला. त्या पहिल्या महिला, अश्वेत आणि भारतवंशी उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...