आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट घेतली व शुभेच्छा दिल्या:नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांना ‘सूर्यदत्त’ परिवाराकडून शुभेच्छा

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी नुकतीच महामहिम द्रौपदी मुर्मू यांची नवी दिल्लीतील शासकीय कार्यालयात भेट घेतली व शुभेच्छा दिल्या. या वेळी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्सच्या विविध शाखांच्या माहितीपुस्तिकेची प्रत भेट दिली. सुषमा चोरडिया यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना ओडिशा व परिसरातून सूर्यदत्तमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती देणारी पुस्तिका भेट केली. आम्हाला दोन वेळा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय होती. शिक्षकांप्रति त्यांना असणारा आदर ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, असे चोरडिया म्हणाले. २००८ ते २०१० मध्ये मुर्मू यांच्या कन्या इतिश्री गणेश हेंब्राम “सूर्यदत्त’ च्या विद्यार्थिनी होत्या. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन येथे त्यांनी २ वर्षांचा मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स केला. इतिश्री मुर्मू-हेंब्राम राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...