आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:कोविड तयारीबाबत बी.जी. वैद्यकीय महाविद्यालय अन् ससून सर्वोपचार रुग्णालयात मॉक ड्रील

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे कोविड तयारी बाबत सोमवारी तातडीचीपाहणी (मॉक ड्रील) करण्यात आली. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार यांनी व.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे भेट देवून सर्व तयारी संदर्भात आढावा घेतला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड तसेच, महाविद्यालयीन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोविड रुग्णांची संख्या वाढल्यास लागणारे मनुष्यबळ, रुग्णालयीन खाटा, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, अॅम्ब्युलन्स, आर. टी. पी. सी. जर तसेच इतर तपासणीसाठी आवश्यक असणा-या किट्स, रसायने, पी.पी. इ किट्स, एन 95 मास्क व महत्वाची औषधे याबाबत विचार विनीमय करण्यात आला. सध्या रुग्णालयात कोविडसाठी 197 रुग्णालयीन वाटा उपलब्ध असून त्या सर्व खाटांसाठी ऑक्सीजनची पर्याप्त सेवा उपलब्ध आहे याबाबत खातरजमा करण्यात आली. तसेच रुग्णालयात पुरेशा प्रमाणात व्हेन्टीलेटर्स असून ते सुस्थितीत आहेत याची चाचणी यावेळी करण्यात आली.

कोविड संदर्भात प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स, अधिपरिचारिका तसेच इतर कर्मचारी असे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कोविडसाठी लागणारी उपकरणे तसेच ऑक्सीजन व इतर औषधे पर्याप्त स्वरूपात उपलब्ध आहेत. पाहणी पथकाने बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या संस्थेच्या कोविड पूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त केले आहे.