आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यंगचित्र माध्यमातून प्रभावी मांडणी करता येते. सध्या त्यांना काही सांगायचे असे मला वाटते परंतु, सद्य प्राप्त परिस्थिती मध्ये त्यांचे कुंचल्याबाबत फास अवळल्याचे दिसून येत आहे. दीर्घकाळ व्यंगचित्र माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यास विशेष महत्व असून व्यंगचित्रकारानी आपली मते कलेतून मांडले पाहिजे.
२०० पेक्षा अधिक दिवाळी अंक आकलन केले असता लक्षात येते की, सडेतोड राजकीय विश्लेषण अभावाने आढळते ही बाब चिंताजनक आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
दिनमार्क पब्लिकेशन तर्फे ' छंदश्री ' आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा -२०२२ च्या वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध इतिहासकार विश्वास पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी शिवाजी चमकिरे, प्रकाश धरिवाल, साहित्य संमलेनाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दिनकर शिलेदार उपस्थित होते.
यावेळी दिव्य मराठीचे दिवाळी अंकातील व्यंगचित्रकार 'ज्ञानेश बेलेकर ' यांना उत्कृष्ठ व्यंगचित्रकार तृतीय पारितोषिकने सन्मानित करण्यात आले. दिवाळी अंकाचे संपादकांचे संमलेन लवकरच घेणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
भारत सासणे म्हणाले, दिवाळी अंकाची मोठी परंपरा आपल्या इथे आहे. दुर्गा पूजा विशेषांक हे दिवाळी अंका नंतर प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. दिवाळी अंकाचे मोठे आकर्षण मराठी भाषिकांना असते आणि त्याचे संग्रह ते जपून ठेवत असतात. छंदश्री माध्यमातून समाजातील सद्य परिस्थितीची जाण समजण्यास मदत झाली. नवीन लेखक याद्वारे पुढे येतात त्यांचे नोंदी आपण ठेऊ शकतो. दीर्घ कथा , लेख मध्ये लिखाण वाढले हे दिलासादायक आहे.
बालकुमार यांच्यासाठी मोजके अंक निघतात ही बाब आगामी काळात विविध अंक काढून दूर केली पाहिजे. दिवाळी अंकाबाबत लिखाणासाठी अनेकजण इच्छुक असून त्यांच्यासाठी दिवाळी अंक व्यासपीठ आहे. चिंतनशिलता वाढत असून आपल्या भोवती जी शंकास्पद परिस्थिती वाटते त्याचे लिखाण झाले पाहिजे.
पाटील म्हणाले, कवींना, लेखकांना व्यासपीठ आज उपलब्ध नाही त्यांना केवळ दिवाळी अंक व्यासपीठ उपलब्ध आहे. मराठी दिवाळी अंकास मोठी परंपरा आहे. मला इतिहासकार नव्हते व्हायचे मला केवळ इतिहास जागरूक नागरिक व्ह्याचे होते. पानिपत माध्यमातून शौर्याचा इतिहास समोर आणू शकलो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.