आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरेगाव प्रकरण:सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून टाकले होते गुन्हेगारी ई-मेल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले मानव अधिकार कार्यकर्ते अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा संगणक हॅक करून त्यांना आरोपी ठरवण्यासाठी काही गुन्हेगारी प्रकारचे मेल टाकण्यात आले होते. रोना विल्सन यांच्या संगणकात असेच पुरावे टाकणाऱ्या हॅकरनेच हा प्रकार केला होता. अमेरिकेतील एका आघाडीच्या दैनिकाने हा दावा केला आहे.

अमेरिकेतील मॅसाच्युएटस््स्थित डिजिटल न्यायवैद्यक कंपनी आर्सेनल कन्सल्टिंगच्या मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. बचाव पक्षांच्या वतीने ही तपासणी करण्यात आली होती. हे संगणक हॅक करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मालवेअर टाकण्यात आला होता आणि एनआयने हेच पुरावे आरोप लावण्यासाठी आधार मानले, असे अहवालात नमूद आहे. दरम्यान, एनआयएचे प्रवक्ते जय रॉय यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत आर्सेनलच्या या अहवालाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सोनिया गांधींसह दहा नेत्यांचे राष्ट्रपतींना पत्र
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व फादर स्टेन स्वामी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्युप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दहा विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...