आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेसरी भूखंड खरेदी प्रकरण:झोटिंग समिती अहवालाची माहिती खाेटी : अजित पवार

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चाैकशी करण्याकरिता त्या वेळचे मुख्यमंत्री यांनी निवृत्त न्यायाधीश झोटिंग समितीची नेमणूक केली हाेती. परंतु सदर समितीचा अहवाल अद्याप विधिमंडळासमाेर आलेला नसतानाही अहवालाबाबत प्रसारमाध्यमात खाेटी माहिती देऊन चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा लाेकशाहीत अधिकार आहे. पूर्वी एखादे वक्तव्य नेत्यांच्या अंगलट आले की ते आम्ही एेकलेच नाही असे सांगण्याचा प्रघात हाेता. परंतु सध्याच्या काळात तसा प्रकार राहिलेला नाही. बंद खाेलीतील चर्चाही बाहेर पडताना दिसून येतात. राज्यातील काँग्रेस नेत्यांत गट-तट दिसून येत नसून काँग्रेस नेत्या साेनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस एकसंध असल्याचे मला दिसून येते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आवाजी पद्धतीने घेतली जाणार अशी चर्चा करण्यात येते, परंतु त्यात काेणतेही तथ्य नसल्याचे पवार यांनी या वेळी बाेलताना स्पष्ट केले.

नवीन पुणे विमानतळाची जागा अनिश्चित
पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला खेड या ठिकाणी हाेणार हाेते, परंतु शेतकरी विराेधामुळे ते पुरंदर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नुकतेच खासदार शरद पवार यांनी अद्याप पुणे विमानतळ कुठे करावयाचे याचा निर्णय न झाल्याचे सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले, पुणे विमानतळाच्या जागेचा शाेध सुरू असून ज्या वेळी जागा निश्चित हाेईल त्या वेळी सर्व माहिती देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...